जळगाव : नगरपालिका व इतर सर्व निवडणुका आगामी काळात कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली आहे. पाचोरा शहर व तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांचा मेळावा पाचोरा शहरातील दैवयोग पाटील मल्टीपर्पज सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात बोलतांना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सदर घोषणा केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पक्षाचे संघटन भक्कम करण्याचे काम सुरु असून त्या दृष्टीने दौरे सुरु आहेत. मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबाद्दला त्यांनी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अँड. अमजद पठाण यांचे कौतुक केले. मेळाव्याचे प्रास्ताविक भाषणात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले की कॉंग्रेस कार्यकर्ता हा शहरात व तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक कामात पडत आहे. आगामी कालावधीत गाव तिथे कमिटी असा उपक्रम राबवला जाणार आहे. कार्यक्रमात राजु महाजन, अँड. अमजद पठाण, इरफान मनियार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्याचे सुत्रसंचलन अमजद मौलाना, डॉ अनिरुद्ध सावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल शिंदे, कल्पेश येवले, गणेश पाटील, प्रदीप चौधरी, शरीफ शेख रवी पाथरवट, शिवराम पाटील, बबलु ढाकरे, सचिन पाटील,सचिन सोनवणे आदींनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, जिल्हा प्रशासन सरचिटणीस जमील शेख, सरचिटणीस जनसंपर्क ज्ञानेश्वर कोळी, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, एस टी सेल प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अँड. अमजद पठाण, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, भडगाव तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, महिला अध्यक्षा ऐश्वर्या राठोड, महीला जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, प्रदीप देशमुख, रवी जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी,प्रदीप सोनवणे, प्रा. एस डी पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, सौ. क्रांती पाटील, महीला शहर अध्यक्षा शीला सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.