जळगाव जिल्ह्यात दुचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका

On: January 21, 2022 8:55 PM

जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेस 27 जानेवारी, 2022 पासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 24 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 25 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 25 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 4.30 वाजता लिफाफे उघडण्यात येतील. जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल. उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment