नाशिकरोडला बिबट्याचा थरार – जेरबंद करण्यात यश

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरातील जय भवानी रस्त्यावरील धुम्रवर्ण गणपती मंदिर, फर्नाडिस वाडी तसेच सदगुरुनगर भागात सोमवारच्या सकाळी नागरिकांना बिबट्या आढळून आला. बिबट्या दिसताच अनेकांची घाबरगुंडी वळाली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकाला जखमी व्हावे लागले.

हे देखील वाचा – अनैतिक संबंधातून आई उठली मुलाच्या जीवावर! प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर!!  http://crimeduniya.com/?p=16569

सुमारे सात तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभाग व स्थानिक पोलिसांना बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. जमलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना कमी अधिक प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला. अ‍ॅड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्याच्या आवारातील कारखाली बिबट्या लपताच त्याच्यावर वनविभागाच्या कर्मचा-यांनी जाळी फेकून कारसह बंदीस्त केले. त्यानंतर त्याला गनच्या माध्यमातून बेशुद्धीचे इंजेक्शन दिले.

दुस-या प्रयत्नात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंज-यात बंद करण्यात आले. हा सर्व थरार सुमारे सहा ते सात तास सुरु होता. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसरंक्षक गणेश झोले, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक उत्तम पाटील, दीपक जगताप, विजयसिंग पाटील, राजेंद्र ठाकरे, इको एको सेस्थेचे अध्यक्ष वैभव भोगले, अभिजीत महाले, आयुष पाटील, सागर पाटील, एकनाथ मंडल, आदित्य सामेळ, योगेश देशमुख, किरण गायकवाड, विनोद साळवे, अतुल धोंगडे, दीपक लवटे आदीनी बिबट्याला शिताफीने जेरबंद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here