अमरावती : अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचारातून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 4) एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयाने विस वर्ष सश्रम कारावास, 15 हजार रुपये दंड व दंड भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास अशा स्वरुपाची शिक्षा ठोठावली आहे. बळीराम उर्फ गोलू भुजनसिंग युवनाते (32) असे सजा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. बेनोडा पोलिस स्टेशन हद्दीत सदर घटना 27 ऑगस्ट 2019 रोजी उघडकीस आली होती.
पीडित मुलगी आणि बाळ यांच्या डीएनए तपासणी अहवालानुसार आरोपी हा नैसर्गिक पिता असल्याचे सिद्ध झाले. न्या. एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयाने आरोपी बळीराम यास दोषी ठरवत विस वर्षाचा सश्रम कारावास, पंधरा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची सजा सुनावली आहे. पीडित मुलीला मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याकामी न्यायालयाने जिल्हा विधी प्राधिकरण यांना निर्देशित केले आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मिलिंद शरद जोशी यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी कय्युम सौदागर व अरुण हटवार यांनी कामकाज पुर्ण केले.