फैजपूर न.प.शौचालय साहित्यात घोटाळा नाही – मुख्याधिकारी लोंढे

On: April 21, 2022 6:04 PM

जळगाव (फैजपूर) : फैजपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील शौचालय साहित्य केवळ कागदोपत्री खरेदी झाल्याच्या चर्चेला आज मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी पुर्णविराम दिला. सर्व साहित्य खरेदी केले असून ते प्रत्यक्षात त्यांनी पत्रकारांना दाखवले. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतचा खुलासा केला.

गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील शौचालय साहित्याची कागदोपत्री खरेदी झाल्याची चर्चा सुरु होती. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक लक्ष्मण चावरे हे परिवाराच्या कामाच्या तणावात होते. त्यामुळे तक्रारदारांना वेळेवर साहित्य दाखवण्यास विलंब झाला. याप्रकरणात कुणी दोषी आढळल्यास तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांसमोर बोलतांना सांगितले. गेल्यावेळी बिलासंदर्भात सखोल चौकशी होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment