जळगाव : लायसनची मागणी केली असता महिला पोलिस कर्मचा-यास चापट मारणा-या वाहनधारक महिलेस तिन महिने साधी कैद व पाचशे रुपयांची दडात्मक शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेखा डिगंबर जाधव असे सजा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. जळगाव शहरातील बेंडाळे चौकात 14 एप्रिल 2016 रोजी सदर घटना घडली होती.
ड्युटीवर असलेल्या महिला वाहतुक पोलिस कर्मचा-याने रेखा जाधव यांना त्यांच्याकडील वाहन परवाना मागितला होता. त्यावेळी राग आल्याने रेखा जाधव यांनी संबंधीत महिला पोलिसाला चापट मारत शिवीगाळ केली होती. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्या. व्ही. बी. बोहरा यांच्या न्यायालयाने सदर शिक्षा सुनावली आहे.