विजय मल्ल्या प्रकरण कागदपत्रे झाली गायब, टळली सुनावणी

विजय मल्ल्या

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांना हजारो कोटींचा चुना लावणा-या विजय मल्ल्या प्रकरणी आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. मात्र त्याच्या गुन्हयाची कागदपत्रे फाईलमधून कशी काय गायब झाली? फाईलमधून कागदपत्रे गायब झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

विजय मल्ल्याचा मुक्काम सध्या लंडन येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत विजय मल्ल्याकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतची सुनावणी 20 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

सन 2017 मध्ये अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यास दोषी ठरवले होते. विजय मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जावून त्याची संपत्ती त्याच्या परिवाराच्या नावे केली होती. 9 हजार कोटी घेऊन पसार

विजय मल्ल्या हा 2 मार्च 2016 मध्ये कोणालाही खबर लागू न देता देशाबाहेर पळाला होता. ब्रिटेनचे पोलीस स्कॉटलंड यार्डने त्याला 18 एप्रिल, 2017 मध्ये अटक केली होती. मात्र, तेथील न्यायालयाने त्याला काही तासांतच जामिनावर सोडले होते. तेथील न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे. त्याच्यावर 17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here