विठ्ठलाची महापुजा शिंदे करणार, मात्र सरकार राहील का? – आ. मिटकरी

यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र शासकीय महापूजा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचे सरकार राहील की नाही हा प्रश्न असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास सर्व गोष्टी पुढे येणार आहेत. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांवर पांडुरंग का नाराज आहे हा देखील एक संशोधनाचा विषय असल्याचा टोला आ. मिटकरी यांनी लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाट्य संपुष्टात आल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच विठ्ठलाची शासकीय महापुजा करणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारक-याची वेशभुषा केली होती. यावेळी विठ्ठलाची महापुजा फडणवीस यांच्या रुपाने भाजपाचा मुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांनी एकप्रकारे सुचीत केले होते. मात्र विठ्ठलाने एकनाथ यांना बोलावले असून हे सरकार नेमके भाजपचे आहे की सेनेचे याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे देखील आ. अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here