पाटणा : महाराष्ट्रात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सुरु असतांना बिहारमधे जेडीयू-भाजप युती तुटणार असल्याचे दिसून येत आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे. आज सायंकाळी नितीशकुमार राज्यपालांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. बिहारमधे जेडीयु आणि राजद आघाडी सरकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातील आमदारांची एक बैठक आज बोलावली होती. या बैठकीत भाजपपासून विभक्त होण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे जवळपास सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता बळावल्याचे म्हटले जात आहे.