नकली घोडा वापरुन होत असते चित्रपटाची शुटींग

अनेक चित्रपटांमधे आपण घोडेस्वारीचे साहसी सीन बघत असतो. मात्र हिरो अथवा हिरोईन वापरत असलेला घोडा हा नकली असतो. प्रेक्षकांना मात्र हा साहसी सीन बघून हिरोचे अप्रुप वाटत असते. मात्र हा सर्व नकली मामला हुबेहुब असली असल्याचा भास निर्माण केला जात असतो. कंगणा रणौत अभिनित मनकर्णीका या चित्रपटात घोडेस्वारीचे सिन दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील केवळ कंगनाचा घोडा नकली व इतर घोडे असली असतात.

आपण असे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्यात घोड्यावर बसून अनेक सैनिक मारले जातात. ते लढताना दिसतात. आपणास प्रश्न पडतो की इतके खरे घोडे आहेत, मग ते खोटे, नकली घोडे का ठेवतात? अनेक वेळा अनेक अभिनेत्यांचा अशा शुटींग दरम्यान अपघात झाले आहेत. खऱ्या घोड्यावर बसताना त्यांचे हातपाय मोडले आहेत. अशा प्रसंगामुळे निर्मात्याचे आर्थिक आणि अभिनेता, अभिनेत्रीचे शारिरीक नुकसान होते. त्यासाठी नायक अथवा नायिकेचा डुप्लिकेट वापरला जातो. ज्यावेळी प्रत्यक्षात नायक अथवा नायिकेचा चेहरा स्पष्ट दिसतो, त्यावेळी नकली घोड्याचा वापर केला जातो.

घोड्याच्या पायाच्या जागी पुढे मागे हालचाल होणारी मोटार वापरली जात असते ती कॅमे-याच्या नजरेत येऊ दिली जात नाही. अनेकदा असली घोडे कॅमे-याच्या अ‍ॅंगलमधे न धावता भलतेच दुसरीकडे धावतात. मात्र नकली घोडे फार प्रामाणीक असतात. ते कॅमे-याच्या अ‍ॅंगलमधेच धावतात. हिरवा क्रोमा आणि नकली घोडा वापरुन त्यावर हिरो अथवा हिरोईनला बसवून शॉट पुर्ण केला जात असतो. नकली घोड्यावर काय चित्रित केले आहे हे कोणालाच कळत नाही. खरा घोडा वेगवान असल्याचे दाखवून प्रेक्षकांना भुरळ घातली जाते. हिरोला घोडा, गाडी, विमान चालवता येत नसले तरी दिग्दर्शक त्याच्याकडून सर्वकाही योग्य रितीने चालवून घेत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here