नकली सिक्स पॅक अ‍ॅब्जचा वापर करुन चित्रपटात मिळते वाहवा

बॉलीवुड चित्रपटांमध्ये आपल्याला अशी अनेक दृश्ये बघण्यास मिळते जे बघून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कधी जिममधे न गेलेल्या फिल्मी हिरोचे सिक्स पॅक आपणास चित्रपटात दाखवले जातात. काही वेळा चित्रपटांमध्ये नायक नायिकेच्या दुहेरी भूमिकाही दाखवल्या जातात. कधी चित्रपटांमध्ये चुंबन दृश्ये दाखवली जातात जी प्रत्यक्षात नायक-नायिकेने केलेली नसतात. चित्रपटातील कलाकार हे सहज करतात आणि हे सगळं कसं घडतं याचा विचार तुम्ही करत असाल.

आजच्या काळात चित्रपटांच्या प्रत्येक अ‍ॅक्शन सीनमध्ये फेक सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवले जातात. हिरोची जबरदस्त बॉडी बघून तरुण वर्ग तसेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटातील अ‍ॅक्शन सिनमधे सिक्स पॅक आवश्यक असल्याचे म्हटले जाते. सिक्स पॅक अ‍ॅब्जची सुरुवात अभिनेता सलमान खानपासून सुरु झाली आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे जास्त काळ आपले शरीर फिट ठेवू शकत नाहीत. पण तरीही चित्रपटात त्यांचे सिक्स पॅक्स दिसतात.

हे संपूर्ण आश्चर्य VFX म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट्सचे आहे. हा एक विशेष प्रकारचा बॉडीसूट आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीला सिक्स पॅक दिले जाऊ शकतात. तो कितीही जाड असला तरी त्याला सिक्स पॅक देण्यासाठी असे बॉडीसूट बनवले जातात, ज्यामध्ये त्याचे शरीर अगदी पोलादी दिसते. ते बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात.

अभिनेता सलमान खानच्या रिहर्सलचा एक व्हिडिओ काही महिन्यापुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सलमानला त्याच्या वाढलेल्या पोटामुळे ट्रोल करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या दबंग चित्रपटातील पांडेजी सिटी बजाये या गाण्यासाठी रिहर्सल करतांना दिसत होता. काळ्या टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये सलमानचे पोट व्हिडीओमध्ये खूप मोठे झालेले दिसत होते. सलमान खान त्याच्या फिटनेसबद्दल नेहमीच चर्चेत असतो, पण व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याचे वाढलेले पोट बघून त्याच्या सिक्स पॅकबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here