महिलेचे न्युड फोटो एकाने दुस-याला पाठवत दोघांचा अत्याचार

जळगाव : महिलेसोबत तिन वेळा शारिरीक संबंध ठेवत तिला व्हिडीओ कॉल करुन न्युड फोटोचे स्क्रीनशॉट मित्राला पाठवण्याचा प्रकार पाचोरा येथे उघडकीस आला आहे. दुस-या तरुणाने देखील त्या विवाहितेसोबत शरिरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दिपक शंकरराव कंखरे रा. कृष्णापुरी पाचोरा आणि सागर चंदन परदेशी रा. हनुमान नगर पाचोरा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एका अनोळखी इसमाचा देखील या गुन्ह्यात समावेश आहे.

पाचोरा शहरातील एका विवाहितेसोबत सुमारे एक वर्षापुर्वी दिपक शंकरराव कंखरे याने बळजबरी तिन वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. तिच्या मुलाला जीवे ठार करण्याची धमकी देत तिला त्याने व्हिडीओ कॉल केला होता. तिच्या न्युड फोटोचे मोबाईलमधील स्क्रिनशॉट त्याने सागर चंदन परदेशी याला पाठवले. दिपकचे व्हिडीओ कॉल रिसीव्ह केले नाही तर तिच्या अंगावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देण्यासाठी कॅनसह एका इसमाला तिच्याकडे पाठवल्याचा महिलेचा आरोप आहे.

दरम्यान न्युड स्क्रिनशॉट मिळालेल्या सागर परदेशी याने देखील या विवाहितेला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत एकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे विवाहितेचे म्हणणे आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here