गेली 37 वर्ष सर्वोच्च न्यायालयात सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिवशी सरन्यायधिश उदय लळीत न्यायालयाच्या पाय-यांवर डोके टेकून नतमस्तक झाले. यावेळी ते भावुक झाले होते.
गेल्या 37 वर्षापासून सरन्यायधिश लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली सेवा बजावली. कारकिर्दीची पहिली 29 वर्ष वकील तर शेवटची आठ वर्ष न्यायधिश म्हणून त्यांनी कामकाज केले. 74 दिवसात न्या. लळीत यांनी एकापेक्षा अधिक घटनापीठ स्थापन केले. अधिकाधिक महत्वाचे निर्णय घेत दहा हजाराहून अधिक खटले निकाली काढण्याचे काम त्यांनी पुर्ण केले. गुणवत्ता नसलेले तेरा हजार प्रकरणे त्यांनी फेटाळले.