जळगाव : राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रे दरम्यान 18 नोव्हेंबर 2022 रोजी शेगाव येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पाचोरा तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सहभागी होणार आहेत. या संदर्भात पाचोरा येथे नुकतीच एक बैठक आयोजीत करण्यात आली होती.
शासकीय विश्रामगृहात आयोजीत बैठकीस पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलवलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्टवादी कॉंग्रेसचे नेते माजी आ. दिलीप वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील, मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, तालुका एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.
पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे. शेगाव येथे जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी दि 14 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.