विवाहीत प्रेयसीसोबतच राहण्याची तिव्र इच्छा – सरपंचाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

On: November 30, 2022 1:43 PM

अहमदनगर : विवाहीत प्रेयसीशिवाय जगूच शकत नाही व तिच्यासोबत राहण्याची इच्छा पुर्ण होत नसल्यामुळे सरपंचाने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. अविनाश मिस्टर चव्हाण असे या घटनेतील श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावच्या सरपंचाचे नाव आहे.

अविनाश चव्हाण या सरपंचाचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध जुळून आले. ते तिच्या पतीला समजले. त्यामुळे तिच्या पतीने तिला मारहाण करण्याचा प्रकार सुरु केला. तिचा पती तिला मारहाण करत असल्याचे समजल्यानंतर या मजनू सरपंचाच्या मनाला इकडे वेदना सुरु झाल्या. पत्नी ऐकत नसल्याचे बघून तिच्या पतीने तिला माहेरी नेवून सोडले. तिला माहेरुन परस्पर पळवून नेण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र वाटेतच दोघांना नाशिकहून परत आणले गेले. मात्र दोघे प्रेमवीर सोबत राहण्याचा हेका सोडत नव्हते.

अखेर जिल्हाधिका-यांच्या नावे लिहिलेले निवेदन देण्यासाठी अविनाश चव्हाण याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पाचव्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर येताच त्याने सोबत आणलेले विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित पोलिस कर्मचारी आय.एफ.शेख यांनी त्याला पालथे पाडून त्याच्या पोटातील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुढील उपचारासाठी त्याला सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment