जळगाव : उधार दिलेली रक्कम परत देण्यास नकार दिल्याने वाढत गेलेला वाद आणि त्यातून आलेल्या नैराश्येतून प्रौढाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्याती नगरदेवळा नजीक शुक्रवारी रात्री घडली. या घटने प्रकरणी संबंधीत डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र महाहन (43) असे आत्महत्या करणा-या इसमाचे तर डॉ. समाधान पाटील असे संबंधीत डॉक्टरचे नाव आहे. दोघेही पाचोरा येथील संभाजीनगर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. डॉ. समाधान पाटील या घटनेनंतर फरार असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेपुर्वी रविंद्र महाजन यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपण आत्महत्या करत असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे आत्महत्या करणा-या रविंद्र महाजन यांनी स्वत:चा प्लॉट विक्री करुन, पत्नीचे दागिने विक्री करुन डॉ. समाधान पाटील यास अठरा लाख रुपये उधार दिले होते. मात्र ती रक्कम देण्यास डॉ. समाधान पाटील यांच्याकडून टाळाटाळ सुरु होती. दिनांक 26 जून रोजी सायंकळी दोघात याप्रकरणी जोरदार वाद झाला असे सांगितले जात आहे. दरम्यान झटापट देखील झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या आत्महत्या प्रकरणाने परिसरात खळबळ माजली आहे.







