जळगाव : विना संमती कॉल रेकॉर्ड करणे हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मधील घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असून हा गुन्हा असल्याचे निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध ईडी कायद्याप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात जामीन देतांना हायकोर्टाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. या वर्षात सप्टेबर महिन्यात कोलकाता हायकोर्टाने देखील फोन कॉलचे रेकॉर्डींग आणि संबंधीत व्यक्तीच्या संमतीविना ते दुस-याला दिल्याने गोपनियतेच्या मुलभुत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा निर्णय दिला आहे.
हायकोर्टाने असे देखील म्हटले आहे की एखाद्या अधिका-याने आयटी कायदा अथवा त्याखालील नियमांनुसार मिळालेले इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड (संभाषण, कॉल डिटेल्स, मेल मेसेजेस इ.) संमतीविना दुस-या व्यक्तीला देणे हा आयटी कायद्याच्या कलम 72 नुसार गुन्हा आहे.