जळगाव (प्रतिनिधी) – महापुरुषा बद्दल भाजपाचे नेते आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याच्या निषेधार्थ आज 13 डिसेंबर रोजी जळगाव महामार्गावर जळगाव ते बांभोरी दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काहींना सकाळपासून स्थानबद्ध करण्यात आले होते. देशाचे मुळ प्रश्न बेरोजगारी, महागाई, जीएसटी यावरचे जनतेचे लक्ष विचलित झाले पाहिजे म्हणून सामुहिक भाजपा वाचाळविर महापुरुषांवर बेताल वक्तव्य करीत आहेत याच्या निषेधार्थ आज पुरोगामी संघटना सह काही पक्षांनी जळगाव ते बांभोरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी सकाळीच अनेकांना बांभोरी पुला जवळ ताब्यात घेतले आहे तर जळगाव ते बांभोरी दरम्यान कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राजेश पाटील, योगेश देशमुख, योगेश पाटील, विजय देसाई खुशाल चव्हाण, प्रफुल्ल पाटील पॅथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नितीन तायडे सह पदाधिकारी यांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले तर रामानंद पोलीस ठाण्यात लोकसघर्ष मोर्चा च्या प्रतिभाताई शिंदे, मुकुंद सपकाळ यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते.
पुरोगामी संघटना सह कॉंग्रेस आय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली यावेळी ” ” सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है ” चंद्रकात पाटील राजीमाना द्या.. छत्रपती शिवाजी महाराज की जय, म. ज्योतीबा फुले की जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय च्या घोषणांनी रामानंद पोलीस ठाण्याचा परीसर दणाणले यावेळी पोलीसांनी काय कारवाई केली हे न सांगितले म्हणून पदाधिकारी पोलीस ठाण्यातुन निघायला आणि पोलीस आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.. यावेळी पुन्हा घोषणा करण्यात आल्या.पोलीस ठाण्यात कॉंग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक अजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महीला माहनगरअध्यक्षा मंगलाताई पाटील,अॅड विजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे आदी उपस्थित होते.