तिकीट नसल्यामुळे रेल्वेला भरपाई नाकारता येत नाही – नागपूर खंडपीठ

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीकडे प्रवासाचे तिकीट आढळून आले नसल्याच्या एकमेव कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. तसेच, संबंधित रेल्वे अपघात पीडितांना आठ लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला.

न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी हा निर्णय दिला. रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात, फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे, हिंसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्ती आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वारसदार रेल्वेकडून भरपाई मिळण्यास पात्र आहेत. परंतु, संबंधित व्यक्ती प्रामाणिक प्रवासी होता, हे आधी सिद्ध होणे आवश्यक आहे. रेल्वे तिकीट नसल्यास त्या व्यक्तिला प्रामाणिक प्रवासी समजले जात नाही. त्यामुळे भरपाई अदा केली जात नाही. परंतु, दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने संबंधित निरीक्षण नोंदविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here