जळगाव : जळगाव जिल्हयात टोळीने गुन्हे करणा-या तिघा गुन्हेगारांना जळगांव जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. विशाल मुरलीधर धावाडे, उदय रमेश मोची (बनवाल), अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव (तिघे रा. रामेश्वर कॉलनी जळगांव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
तिघांविरुद्ध एमआयडीसी आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. हद्दपार करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. तिघांपासून जनतेच्या जिवीतासह मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.