पुणे : आंतरजातीय प्रेमविवाह केला मात्र वैचारिक मतभेदामुळे गेल्या 19 महिन्यापासून विभक्त रहात असलेल्या पतीला परदेशात नोकरीसाठी जायचे असल्यामुळे तातडीने 25 दिवसात जामीन मंजूर करण्यात आला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी या उच्च शिक्षीत दाम्पत्याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे रहात असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो.
या प्रकरणात दोघे गेल्या 19 महिन्यांपासून वेगळे रहात आहेत. अशिलास मार्च 2023 मध्ये परदेशात नोकरीसाठी जायचे आहे. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी पतीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पतीच्या वतीने अँड. राणी कांबळे-सोनावणे, अँड. ज्ञानदा कदम, अँड. आरती परकाळे आणि अँड. कल्पना गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तर पत्नीच्या वतिने अँड. तारक पाटील, अँड, रोहन शेट्टी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.