अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास 12 वर्ष कैद

On: April 10, 2023 9:14 PM

जळगाव : अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार व त्यातून तिला गर्भवती करणा-या आरोपीस धरणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. शरद सखाराम भिल असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील शरद भिल याने तिला पालकांच्या रखवालीतून पळवून नेले होते. याप्रकरणी सन 2020 मधे आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग 5 गु.र.न. 73/20 भा.द.वि. 363, 366 (अ), 376(1), 376 तसेच पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 जून 2020 रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील जंगलात आणि मंजरेहोळ शिवारात त्याने पिडीत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला होता. त्यातून तिला गर्भधारणा झाली होती. आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.   

आरोपी शरद सखाराम भिल (रा.नारणे ता.धरणगाव) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश  अमळनेर यांनी भा.द.वि. 376 मध्ये 7 वर्ष कैद, पोस्को कायदा कलम 4 मध्ये 12 वर्ष कैद, कलम 5(j)(ii) मध्ये 12 वर्ष अशी एकत्रित 12 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. या  गुन्ह्याचा तपास तत्कालीन स.पो.नि. मनोज पवार यांनी केला. त्यांना हे.कॉ. प्रदीप राजपूत यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आर. बी. चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केस वॉच पोलिस कर्मचारी नितीन कापडणे यांनी सहकार्य केले.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment