नवी दिल्ली : जोडीदारास जाणूनबुजून लैंगिक संबंधापासून वंचीत ठेवणे मानसिक क्रौर्य असल्याचे मत दिल्ली येथील एका न्यायालयाने नमुद करत जोडप्याचा घटस्फोट मंजुर केला आहे. या प्रकरणी पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. लग्नानंतर कित्येक वर्ष पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवले नव्हते. हा आपल्यावर मानसिक अत्याचार असल्याचा आरोप पतीने न्यायालयात केला होता.
या खटल्यातील पती पत्नीचे सन 2014 मधे लग्न झाले होते. मात्र दोघांमधे शरीर संबंध आले नव्हते. कौटूंबिक न्यायालयाचे विपीन कुमार राय यांनी आपल्या आदेशात नमुद केले की लैंगिक संबंध हा सुखी आणि सुसंवादी वैवाहीक जीवनाचा मुलभुत भाग आहे. तरुण नवविवाहीत जोडीदाराला जाणूनबुजून संबंध ठेवण्यास नकार देणे मानसिक क्रुरता असल्याचे मत न्यायालयाने दिले आहे.