जळगाव : महिलेचा खून करणा-या आरोपीस जन्मठेपेसह पाच हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेश सुकलाल महाजन असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या खून प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 567/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने दंड न भरल्यास तिन महिने साधा कारावास असे शिक्षेचे स्वरुप देण्यात आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायधिश सौ. एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. या गुन्ह्याच्या तपासकामी तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या पथकातील हे.कॉ. राजेंद्र कांडेकर, दिपक चौधरी, केसवॉच विशाल कोळी आदींचे सहकार्य लाभले. सहायक सरकारी अभियोक्ता पी.बी. चौधरी यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून हे.कॉ. तारचंद अरविंद जावळे यांनी कामकाज पाहिले.