दारुची दुकाने सुरु मात्र मंदिर बंद; वारकरी ठिय्या आंदोलन करणार

On: August 22, 2020 10:40 PM


अकोला : ‘देशी दारूची दुकाने आज उघडी असून मंदिरे बंद आहेत. हे सरकार म्हणजे हिरण्य कश्यपचे सरकार असल्याचे मत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 31 ऑगस्ट रोजी सरकारला जागे करण्यासाठी पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश महाराजांनी दिला आहे.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. वारकऱ्यांमध्ये महात्मा गांधी जिवंत झाले असून ते आता 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी देखील दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment