चोरीच्या चार दुचाकींसह चोरटा अटकेत

On: July 27, 2026 5:21 PM

जळगाव : पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे एक लाख विस हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अमोल राजेंद्र ढमाळ ( रा. नांद्रे खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी मास्टर कीच्या सहाय्याने दुचाकी चोरी करत असल्याचे तपासात समोर आले.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या चारही मोटारसायकलींची अंदाजे किंमत तिस हजार रुपये इतकी असून त्यामध्ये तीन काळ्या रंगाच्या बजाज प्लॅटिना आणि एक काळी-सिल्व्हर रंगाची बजाज प्लॅटिना अशा चार मोटारसायकलचा समावेश आहे. या प्रकरणी भडगाव, पाचोरा आणि एमआयडीसी भोसरी (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि त्यांच्या पथकातील स.पो.नि. प्रदीप शेवाळे, पोलिस उप निरीक्षक कृष्णा घायाळ, हे.कॉ. विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, पो.कॉ. योगेश पाटील, संदीप पाटील, हरीष परदेशी आदींनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment