स्व.पार्श्वगायक मुकेश यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गीतगायन

On: July 20, 2023 5:17 PM

जळगाव : मुकेश जोरावरचंद माथुर अर्थात मुकेश या नावाने ओळखले जाणारे भारतीय पार्श्वगायक होते. २०२३ हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष. मुकेश यांचा जन्म दि. २२ जुलै १९२३ तर मृत्य दि.२७ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवुड वर अधिराज्य करणार्या ह्या कलावंतानी गायलेली गाणी हि आजच्या पिढितील तरुण तरूणींच्या ओठी आहेत. अजरामर अशी गाणी त्यांनी भारतीय चित्रपटांसाठी गायली व अजरामर केली.

मुकेश यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता दि. २२ जुलै २०२३ रोजी होत असून या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे कलावंत त्यांनी गायलेल्या गीतांचे सादरीकरण करून आदरांजली वाहणार आहेत. हा कार्यक्रम दि. २२ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता रोटरी क्लब हॉल, गणपती नगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शुभांगी भारदे (उप-जिल्हाधिकारी) व श्री. भालचंद्र पाटील (व्यवस्थापकिय संचालक, वेगा केमिकल्स प्रा. लि.) म्हणून उपस्थित राहणार आहेत. शतायु मुकेश… या कार्यक्रमात जळगावचे ज्येष्ठ कलाकार श्री. आर. डि. पाटील, वैशाली शिरसाळे, प्राजक्ता केदार व ऐश्वर्या परदेसी सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी तमाम जळगावकर रसिकांना विनंती कि आपल्याच शहरातील या गुणी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थिती द्यावी ही विनंती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment