पुणे : ई-पास रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. तो निर्णय देशातील नागरिकांना नजरेसमोर ठेवून घेतला आहे. असे असले तरी राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. त्यानुसार योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.
इतर राज्यातील भौगिलिक आणि कोरोना बाबतची परिस्थितीही निराळी आहे. त्यामुळे ई पास बाबत मुख्यमंत्र्यांशी विचार विनीमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात यईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे सांगितले. जम्बो हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी अजित पवार आज पुणे येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांनी ई पास बाबत माहिती दिली.