समाजगौरव पुरस्काराने दीपककुमार गुप्ता सन्मानित

On: August 6, 2023 7:17 PM

जळगाव : संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी दीपककुमार गुप्ता हे न्यायालयीन कामकाजानिमीत्त मुंबई येथे होते. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून निखील भावसार यांनी हा पुरस्कार स्विकारला.

गुप्ता यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भ्रष्टचार विरोधी समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार आणि सन्मानपत्र देवून दीपककुमार गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. भ्रष्टाचार विरोधी समिती संभाजीनगर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद साबेर सैय्यद सरदार यांनी गुप्ता यांच्या कार्याची दखल घेतली.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment