नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाला पुर्ण वेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत पत्राच्या माध्यमातून बड्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी विरुद्ध काही बडे नेते असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाची कमान गांधी परिवाराकडेच रहावी असा देखील एक सुर या निमित्ताने उमटत आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी परिवाराकडेच असावे अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या मागणीच्या सुरात सुर मिळवण्याचे काम महाराष्ट्राचे बाळासाहेब थोरात व काही नेत्यांनी केले आहे. सोनीया गांधी यांना पर्याय म्हणून केवळ राहुल गांधी यांना मानणारा एक गट पक्षात मोठ्या प्र्माणात असल्यामुळे गांधी परिवारेतर अध्यक्षपदाची चर्चा धुसर होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे. आज होणा-या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत याचे परिणाम दिसून येणर आहे.