जळगांव : सात वर्षीय बालिकेच्या खूनप्रकरणी तिच्या वडीलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी आजन्म कारावास ठोठावला आहे. संदीप यादव चौधरी (वय ३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मुलगी कोमल चौधरी (वय ७) यांच्यासह हिराशिवा पार्कमध्ये राहत होता. संदीपला दारू पिण्याचे व्यसन होते. ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी त्याने दारू पिण्यावरून पत्नी नयना हिला मारहाण केली. त्यावेळी पप्पा मम्मीला मारू नका असे मुलगी कोमल संदीपला म्हणाली होती. याचा त्याच्या मनात राग होता. दुपारी ४ वाजता नयना यांनी कोमल हिला
शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. त्यानंतर बांभोरी पुलाच्या खाली तिचा खून केला. या बाबत तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. क्यू. एस. एम शेख यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमूर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठरवून आजन्म कारावास व पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र का करीत आहे.