भुसावळच्या खूनी घटनेत मयतांची संख्या झाली चार?

On: September 2, 2023 4:29 PM

जळगाव : भुसावळ येथे दोन वेगवेगळ्या घटनेतील प्राणघातक हल्ल्यात मृतांची संख्या आता चार झाली असल्याचे समजते. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा भावांची काल रात्री हत्या झाली. या प्राणघातक हल्ल्यात चाकू आणि तलवारीचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात सुरुवातीला शांताराम भोलानाथ साळुंखे आणि राकेश भोलानाथ साळुंखे या दोघा भावांचा मृत्यू झाला. दरम्यान उपचार घेणा-या दोघा जखमींपैकी एका तरुणाचा देखील मृत्यू झाल्याचे समजते. त्यामुळे कंडारी येथील खूनाच्या घटनेतील मृतांची संख्या तीन झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत संशयित आरोपींची संख्या चार ते पाच असून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान रात्रीपासून पोलिस तपासकामी राबत असून त्यांची झोप देखील झालेली नाही.

दरम्यान दुस-या घटनेतील गुन्हेगार निखिल राजपूत याच्या हत्येमागे अनैतिक संबंधाची किनार असल्याचे म्हटले जात आहे. पहाटे दोन वाजेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरातील पाण्याच्या टाकीवर घडलेल्या या घटनेत निखिल राजपूत याचा शालक नीलेश ठाकूर हा संशयित आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत चाकूचा वापर करण्यात आला. एकाच वेळी दोन खूनाच्या घटना घडल्याने भुसावळ शहरात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment