१४ सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Parliament of India

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. संसदीय व्यवहारांबाबतच्या कॅबिनेट कमिटीने १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहात खबरदारी घेतली जाणार आहे.

यावेळी एकूण १८ बैठका घेतल्या जाणार आहेत. होणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी खास बैठक व्यवस्था केली जाणार आहे. करण्यात येणार आहे. सभासद गॅलरी आणि चेंबर अशा दोन्ही ठिकाणी बसणार आहेत.

१९५२ नंतर पहिल्यांदाच संसदेत अशी आसनव्यवस्था केली जात आहे. कामकाजाच्या वेळी साठ सदस्य चेंबरमध्ये तर ५१ गॅलरीत आणि इतर १३२ चेंबरमध्ये बसणार आहेत. अशीच व्यवस्था लोकसभेत देखील केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here