12 लाख दंड प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहा जणांची नावे आली समोर

जळगाव : तिघा जणांना बेकायदा ताब्यात घेण्यासह त्यांची भाड्याची जागा न्यायालयीन  आदेशाविना पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना एकुण बारा लाख  रुपयांचा दंड  सुनावला आहे.  पोलिस निरीक्षक, एक पोलिस उप निरीक्षक, तिन  हवालदार आणि  एक हेड कॉन्स्टेबल अशा  एकुण सहा जणांचा यामधे समावेश आहे.

अमळनेर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जयपाल हीरे यांच्यासह शत्रुघ्न आत्माराम पाटील, मिलिंद अशोक भामरे, सुर्यकांत रघुनाथ साळुंखे, निलेश सुभाष मोरे, सुनिल कौतिक हटकर अशी या सहा जणांची नावे आहेत. दंडाची रक्कम दोघा तक्रारदारांना प्रत्येकी सहा लाख रुपये अदा करायची आहे. पोलिस कॉंस्टेबलने प्रती तक्रारदार पन्नास हजार, हेड कॉंस्टेबलने प्रती तक्रारदार एक लाख रुपये, पोलिस उप निरीक्षकाने प्रती तक्रारदार दीड लाख रुपये आणि पोलिस निरीक्षकाने प्रती तक्रारदार दोन लाख अशी एकूण बारा लाख रुपयाची दंडात्मक रक्कम चार  आठवड्यांच्या आत सशस्त्र सेना युद्धातील शहीद कल्याण निधी, कॅनरा बॅंक शाखा दक्षिण ब्लॉक, सरंक्षण मुख्यालयाच्या आत  जमा  करायची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here