चाळीसगावला गोळीबार – माजी नगरसेवक जखमी

On: February 7, 2024 6:56 PM

जळगाव : चाळीसगाव येथे गोळीबार झाल्याची घटना आज घडली. या  घटनेत माजी नगरसेवक बाळू मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे. दरम्यान हा गोळीबार कोणत्या कारणातून झाला हे अद्याप उघड झाले नसून या घटनेने खळबळ माजली आहे.

चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळू मोरे हे सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. घटनेनंतर गोळीबार करणारे पलायन करण्यात यशस्वी झाले आहेत. या घटनेतील एक जण सीसीटीव्हीत कैद  झाल्याचे समजते. पुर्व वैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचे म्हटले जात आहे. पोलिस पथक गोळीबार करणा-यांचा माग  काढत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment