फार्म हाऊसमधून साहित्य चोरट्यास अटक 

On: February 14, 2024 8:30 AM

जळगाव : फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीनसह विविध साहित्य चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. आबा प्रकाश भिल (रा. बुधली धरण, शिरसोली) असे चोरट्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

शिरसोली गावानजीक असलेल्या बुधली धरण परिसरातील विजयकुमार कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून 9 फेब्रुवारी रोजी दोन हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशीन, 1200 रुपये किमतीची हॅंड-कटर मशीन,1200 रुपये किमतीचे वायरचे दोन बॉक्स असे साहित्य चोरुन नेले होते. या चोरीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान हा गुन्हा आबा प्रकाश भिल याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन  आव्हाड यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अधिकार पाटील, पोहेकॉ समाधान टाकळे, जितेंद्र राठोड, पोकॉ. शुद्धोधन ढवळे, मुकेश पाटील, प्रदीप ठाकुर, ललित नारखेडे आदींच्या पथकाने आबा भिल याला ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment