बनावट मद्य कारखान्यावर छापा – लाखोंचा मुद्देमाल जप्त

On: February 16, 2024 9:08 PM

जळगाव – भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारु तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना एकास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी 46 लाख 37 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यवाहीत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment