देशात एकाच वेळी अनेक निवडणुका घेण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सामान्य मतदार यादीबाबत त्यांच्या कार्यालयात एक बैठक व चर्चा झाली आहे. ही मतदार यादी लोकसभा, विधानसभा व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जावू शकते.
खर्च व संसाधने वाचविण्यासाठी सरकारने सामान्य मतदार यादी व एकाच वेळी निवडणुकांची घोषणा कदाचीत होवू शकते. बहुतेक राज्ये स्थानिक निवडणुकांच्या मतदार यादीऐवजी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा वापर करत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, जम्मू-काश्मीर या राज्यांची स्वतःची मतदार यादी आहे.