गुजरातमधील सर्व शाखीय सोनार समाज बांधव – भगिनींना आवाहन

On: February 24, 2024 7:31 PM

संपूर्ण भारतात सोनार समाज राज्य ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. केवळ गुजरात राज्यात सोनार समाज ओबीसी सवलतीसह आरक्षणापासून वंचित आहे. गुजरात  राज्यातील सोनार समाजाला राज्य ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सर्व सोनार बांधव आणि भगिनींनी समर्थन आणि पाठिंबा देण्याचे आवाहन सकल भारतीय सोनार संघटन संस्थेचे संस्थापक मिलिंद सोनार (नाशिक रोड) यांनी केले आहे.

सकल भारतीय सोनार समाज संघटन लवकरच “सेतुबंधन” माध्यमातून गुजरात राज्यातील सर्व शाखीय सोनार समाजास ओबीसी सवलती मिळाव्यात यासाठी व्यापक मोहीम हाती घेत आहे. या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी तसेच गुजरात राज्यातील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नाव आणि आडनाव, राहण्याचे ठिकाण – गाव शहर तालुका जिल्हा राज्य अशी माहिती 9764957362 या व्हॉट्सॲप क्रमांकावर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे. माहिती शेअर करताना गुजरात सोनार ओबीसी सवलत मोहिमेस सहभागी होऊ इच्छितो / इच्छिते, असे नमूद करावे असे देखील आवाहन करण्यात आले  आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment