महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार करणा-यास अटक

On: March 4, 2024 3:24 PM

जळगाव : शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याचा वेळोवेळी धाक दाखवत महिलेस हॉटेलमधे नेवून तिच्यावर अत्याचार करणा-यास अटक करण्यात आली आहे. भुषण नीलेश पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भुषण याने अत्याचारासह पिडीत महिलेकडून तीन ते चार लाख रुपयांचे दागिनेदेखील घेतल्याचा आरोप आहे.

भुषण पाटील याच्यासोबत पिडीतेची ओळख  झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी जवळीक साधत तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडीओ तयार केला होता. पिडीतेस त्याने एका को-या कागदावर सही  करण्यास म्हटले होते. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला ठार करण्याची धमकी दिली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला 2 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment