सुधारीत वृत्त – अमळनेर पो. स्टे.च्या दोघांची कसुरी बदली : शरद  पाटील, दिपक माळी,रवींद्र पाटील यांच्या प्रशासकीय बदल्या

On: March 4, 2024 6:38 PM

जळगाव : अमळनेर पोलिस स्टेशनच्या तिघांच्या प्रशासकीय तर केवळ दोघांच्या कसुरी बदल्या झाल्या आहेत. सुधारीत वृत्तानुसार कपील अशोक पाटील यांची अमळनेर येथून रावेर येथे तर योगेश संपत पाटील यांची यावल पोलिस स्टेशनला कसुरी बदली करण्यात आली आहे. योगेश संपत पाटील यांची यापुर्वी कार्यालयीन आदेशाने भडगाव येथे करण्यात आलेली नेमणूक नव्या आदेशाने रद्द करण्यात आली  आहे.

हे.कॉ. शरद तुकाराम पाटील यांची कसुरी बदली झाली नसून त्यांच्या नेमणूकीच्या आदेशात अंशत: बदल  करुन त्यांची प्रशासकीय कारणास्तव कामकाजासाठी भडगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. दिपक शांताराम माळी यांची अमळनेर येथून बोदवड येथे तर  रविंद्र अभिमन पाटील यांची अडावद पोलिस स्टेशनला प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment