जळगाव : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून दोन्ही जागांवर भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. मतमोजणीच्या दोन फे-या आटोपल्या आहेत. जळगावच्या पहिल्या फेरीत शिवसेनेच्या करण बाळासाहेब पवार यांना एकुण 14477 तर भाजपच्या स्मिता वाघ यांना 29702 मते पडली आहेत. जळगावच्या पहिल्या फेरीत एकुण मतदान 47670 एवढे झाले आहे. रावेरच्या पहिल्या फेरीत भाजपच्या रक्षा खडसे यांना 24094 तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना 15569 मते पडली आहेत. रावेरच्या पहिल्या फेरीत एकुण मतदान 49532 एवढे झाले आहे.
जळगावच्या दुस-या फेरीत शिवसेनेच्या करण बाळासाहेब पवार यांना एकुण 16220 मते पडली आहेत. दुस-या फेरीअखेर त्यांना एकुण मते 30697 पडली आहेत. भाजपाच्या स्मिता उदय वाघ यांना दुस-या फेरीत 29078 मते पडली आहेत. दुस-या फेरी अखेर स्मिता वाघ यांना 58780 एवढे मतदान झाले आहे. जळगाव मतदार संघाच्या दुस-या फेरी अखेर एकुण मतदान 96892 झाले आहे. रावेरच्या दुस-या फेरीत भाजपाच्या रक्षा खडसे यांना 24722 मते पडली. दुस-या फेरीअखेर त्यांना एकुण 48816 मते पडली. प्रतिस्पर्धी रा.कॉ.चे श्रीराम पाटील यांना दुस-या फेरीत 14154 मते मिळाली. तर दुस-या फेरी अखेर पाटील यांना एकुण 29725 मते मिळाली.