आजचे राशीभविष्य (2/9/2020)

मेष

आज आपल्या पैशांची बचत करण्याचा विचार करा. आपल्या मताचे खूप कौतुक होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळण्याची शक्यता आहे.

मिथुन

तुमचे स्वास्थ्य आज चांगली साथ देईल. आर्थिक दृष्ट्या आजचा  दिवस मिळता-जुळता राहील. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कठीण मेहनत घ्यावी लागेल.

सिंह

आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक राहण्याची शक्यता आहे. नवीन कामासाठी तुम्हाला आज अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे.

तुळ

आरोग्याच्या दृष्टीने आज अतिशय चांगला दिवस. तुमचे मन तुम्हाला योग्य ती सकारात्मक ऊर्जा देईल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. कष्टाचे पैसे गुंतवणूक करतांना नीट विचार करा.

धनु

क्रिएटिव्ह कामात स्वत:ला गुंतवा. योग्य व्यक्तीची साथ घ्या आणि अयोग्य व्यक्तीची साथ सोडा. जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल.

कुं

आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड लाभेल. त्यामुळे आपल्या आशा – आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तथापी, तुम्हाला यापासून भिती बाळगण्याची आवश्यकता नाही.

वृषभ

तुमच्या नात्यातील सगळ्या तक्रारी आज निघून जातील. गरजूंना मदत करण्याच्या  तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला मानसन्मान मिळेल.

कर्क

आपल्या रागावर योग्य ते नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी विवादात्मक विषय काढणे टाळा.

कन्या

सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे लोकांवर तुमचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पुर्ण करण्यास चांगला दिवस आहे.

वृश्चिक

अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर अर्ज करण्यास आजचा दिवस उत्तम आहे.

मकर

दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आज प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी तुम्ही करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर सक्ती करण्याचा प्रयत्न करू नका.

मीन

सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची आज पूर्ण शक्यता आहे. उधार दिलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here