भुसावळ विभागातून जाणाऱ्या बारा गाड्या ब्लॉकमुळे रद्द

On: September 12, 2024 11:31 AM

जळगाव : भुसावळ विभागातील गाळण ता. पाचोरा येथील रेल्वे स्थानकात अप – डाऊन मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. त्यासाठी 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत जवळपास बारा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

या नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे रद्द करण्यात आलेल्या मेल एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत. क्र. 02187 रेवा – मुंबई विशेष (12 रोजी), क्र. 02188० मुंबई रेवा विशेष (13 रोजी), क्र. 12114 नागपूर पुणे एक्स्प्रेस (13 सप्टेंबर), क्र. 12114 पुणे नागपूर एक्स्प्रेस, (14 रोजी) रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय क्र. 11025 अमरावती – पुणे एक्स्प्रेस, क्र. 11025 पुणे – अमरावती एक्स्प्रेस, क्र. 11119 इगतपुरी भुसावळ मेमू, क्र. 11120 भुसावळ इगतपुरी मेमू, क्र. 11113 देवळाली – भुसावळ मेमू, क्र. 11114 भुसावळ देवळाली मेमू, क्र. 01211 बडनेरा नाशिक विशेष आणि क्र. 01212 नाशिक बडनेरा विशेष या गाड्या 12 व 13 रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment