बीएसएनएल करणार २० हजार कर्मचारी कपात ?

On: September 5, 2020 2:57 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उपद्रव सुरु झाल्यापासून अनेक कंपन्या आर्थिक संकटात आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बिएसएनएल य सरकारी कंपनीने २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने जवळपास २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा बीएसएनएलच्याकर्मचारी युनियने केला आहे. यापुर्वी बीएसएनएलने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले नसल्याचे देखील युनियने म्हटले आहे.

स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेनंतर (व्हीआरएस) कंपनीची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली असल्याचे युनीयनने म्हटले आहे. विविध शहरांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे नेटवर्क सदोषपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कर्मचारी युनियनने दिलेल्या माहितीनुसार व्हीआरएस योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना गेल्या १४ महिन्यांपासून वेळेत पगार देण्यात आला नाही. बीएसएनएलने सर्व मुख्य महाव्यवस्थापकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच ठेकेदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी कपात करण्यास म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment