71 हजाराची लाच घेतांना भु कर मापक एसीबीच्या जाळ्यात

On: July 29, 2026 8:18 PM

जळगाव – जळगाव भुमी अभिलेख उप अधिक्षक कार्यालयातील भु कर मापक अधिका-यास 71 हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना आज घडली. या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटरचाही समावेश करण्यात आला आहे. राहुल ताराचंद कोळी असे भु कर मापक अधिका-याचे तर कल्पेश सोमनाथ पाटील असे डाटा एंट्री ऑपरेटरचे नाव आहे.

तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी आणि संबंधित शासकीय काम करून देण्यासाठी सुरुवातीला 70 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान नोटीस पाठवण्यासाठी स्टॅम्प शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त रकमेचीही मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भु कर मापक अधिका-याने स्वतःसाठी आणि कार्यालयाच्या नावाखाली एकूण 71 हजार सातशे रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. करंज (ता. जि. जळगाव) येथील बसस्थानक परिसरात उपअधीक्षक राहुल ताराचंद कोळी यांना 71 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांनी केले असून, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment