महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येला महिना उलटला. हा महिना संपत असतांना त्यांचे बंधू धनंजय पुत्र, पुत्री वैभवी, मातोश्री यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली. तत्पूर्वी माध्यम प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता आम्हाला न्याय पाहिजे अशी मोघम मागणी त्यांनी केली. सरपंच देशमुख यांची हत्त्या ज्या भीषणरीत्या करण्यात आली त्याचे किस्से समाजमन हेलावणारे आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून घरल्यामुळे आता दिल्ली जागी झाली आहे. हत्त्या करणारे वाल्मिक कराड यांचे नाव घेत आहेत.
देशमुख यांच्या हत्त्येमागे २ किंवा ३ कोटीची खंडणीची मागणी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रचंड रक्कम मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीत गतवर्षीय पुढे आल्याचे व निवडणूकीसाठी निधी मागून संबंधितांनी ५० लाख रूपये देखील घेतल्याचे आ. धस सांगत आहेत. अशा प्रकारे कोट्यवधीची रक्कम मंत्रीमहोदयांच्या सांगण्यावरून किंवा वरदहस्त पाठीशी असल्यानेच वाल्मीक कराडने मावसभाऊ चाटे यांच्या मोबाईलवरून आबादा कंपनी अधिकाऱ्यांकडे मागितल्याचे समोर आले आहे. यानंतर आ. धस यांनी ज्या पध्दतीने काही बाबी नजरेसमोर आणल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित अध्यक्ष अजितदादा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची पुराव्या शिवाय कारवाई नाही ही भूमिका जनतेसमोर आली. परंतु खा. संजय राऊत यांनी पुराव्या शिवाय आम्हास इडीने आत टाकले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कुण्या फौजदाराच्या सांगण्यावरून केस झाली व त्यांनाही वर्षभर डांबून ठेवले. या गृमंत्री राहिलेल्या देशमुखांवर १०० पेक्षा जास्त धाडी घालून त्रास दिल्याचे संजय राऊत म्हणाले.
यानंतर अंजली दमानिया यांनी बाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची पत्नी कोण्या कंपनीत संचालक असल्याची कागदपत्रे समोर आणली आणि त्यांचे व्यावसायीक संबंध असल्याचा दावा केला. आ. धस, दमानिया, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड यांची १५०० कोटींची मालमत्ता संपत्ती सांगितली जात आहे. एकीकडे या खटल्यातील आरोपीत वाल्मीक कराड व अन्य ६ आरोपीची ज्या पध्दतीने शरणागती झाली ती पाहता फडणवीसांचे गृहखाते म्हणजे पोलीस, सी. आय. इक्ष., एस.आय.टी, गुमहेर खाते एकाही आरोपीला पकडू शकले नाही, असे सोशल मिडीया गाजवणारांनी सांगितले. फडणवीस आणि त्यांचे पार्टनर अजितदादा कोणाचीही गय केली जाणार नाही असे आजवर सांगत राहीले आहेत. दरम्यान ज्यांचा खून झाला त्या संतोष देशमुखाचे कुटूंबिय यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून या प्रकरणात न्याय हवा ही मोघम मागणी केली आहे. काय केले किंवा दिले? म्हणजे या कुटूंबाला न्याय मिळेल असे काही प्रश्न त्या भेटीतून निर्माण झाले आहेत. या कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणजे कुटूंबातील एक सदस्य खून झालेल्यांची पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा पर्याय पुढे ठेवण्यात आला.
भावाला काय मिळणार? मुलीला काय? मुलास काय? हे प्रश्न आहेतच असे सांगितले जाते. मुंडे यांना मंत्री मंडळातून काढा किया आरोपींना फाशी द्यावे काय? हे काही पिडीत परिवार म्हणत नाही. आरोपींच्या फाशीची मागणी दस्तुरखुद्द वाल्मिक कराड यांनी केली आहे. वाटल्यास दोषीना फासावर चढवा, पण माझे मंत्रीपद अढळ ठेवा असे मुंडे सुचवत आहेत. या प्रकरणात दुसऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनाही भाजून काढण्याचा गेम खेळला गेला. त्या बराचवेळ दादांप्रमाणे मौनीचाबा बनल्या होत्या. आता त्या बोलल्या मुंडे भावडांच्या मामी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपली तीन कोटीची जमिन हडपल्याचा आरोप केला आहे. १०९ मृतदेह मिळाल्याचे समोर आले आहे. परळीत मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचे आशिर्वादामुळे नंगा नाच सुरू होतो. हे सर्व स्व. गोपीनाथ मुंडे काळापासून होते असे म्हणतात. अर्थात हाही एक आरोप आहे. पवन चक्क्यांची संख्या २२५ ते २५० सांगितली जाते. राख माफिया, वीटभट्टी माफिया, गुंड टोळ्या. हे सर्व बाहेर आले. रा.कॉ. नेते शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रातील ही भीषण माहिती दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहापर्यंत पोचवण्यात आली. महोदय शाह, फडणवीस, अजित पवार यांच्या बैठकी झाल्या. एकंदरीत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांचेवर कारवाईचा बॉल दिल्लीकरांकडे टोलवण्यात आला. तेथे मोदी सरकार आणखी मजबूत करण्यासाठी रा. काँ. पुन्हा फोडावी असा डावपेच आहेत. अर्थात हे पुण्यकर्म फडणवीस किंवा अजितदादा यांनी करावे असे सांगितले जाते.
दुसरे डेप्यु.सी.एम. शिंदे, महाराष्ट्राचे उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांना महत्वाकांक्षी नेते कितीही म्हटले तरी दिल्लीची जाहीर झालेली निवडणूक पाहता त्यांना केवळ बुध्दीच्या पटावरील सांगण्या एवढेच दिल्ली आज तरी स्थान देईल असे म्हटले जात आहे. खा. संजय राऊत, सुषमा अंधारे, आ. जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, आमदार धस, कितीही ओरडले तरी तेच होईल जे दिल्लीश्वरांच्या मनात आहे. आर. एस.एस. च्या मनात आहे.