पत्नीस पळवून नेण्याच्या वादातून खून – आरोपीला जन्मठेप

धुळे : साक्री तालुक्यातील जामखेल गावात सहा वर्षांपूर्वी पत्नीस पळवून नेल्याच्या कारणावरून झालेला वाद व त्यातून खूनाच्या घटनेतील आरोपी विजय लक्ष्मण पवार याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी जन्मठेपेसह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

सहा वर्षांपूर्वी आरोपी विजय लक्ष्मण पवार याने सुरेश मोतीलाल थवील यांच्या पत्नीस पळवून नेले होते. या कारणावरून आरोपी विजय पवार व सुरेश थवील यांच्यात वाद झाला होता. याबाबत पिंपळनेर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. ५ मे २०१७ रोजी सकाळी दहाला साक्री तालुक्यातील जामखेल शिवारात सुरेश थवील हा गुरे चारण्यासाठी गेला होता. 

सुरेश थवील गुरे चारत असतांना आरोपी विजय पवारने त्याच्या छातीत भोसकून जीवे ठार मारले होते. याप्रकरणी पिंळनेर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासी अंमलदार सहाय्यक निरीक्षक सुनील भाबड यांनी सखोल चौकशी करीत आरोपी विजय पवार विरोधात दोषारोपत्र दाखल केले होते. आरोप निश्चितीनंतर खटल्याचे सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे येथे झाली. सुनावणीवेळी अतिरिक्त शासकीय अभियोक्त अॅड. गणेश पाटील यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अंमलदार सुनील भाबड यांची साक्ष नोंदविली. एकूण ८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात मांडण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here