योगेश भालेराव सन्मानित

On: September 9, 2020 6:19 PM

जळगाव : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश भालेराव यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. राजनंदिनी बहुउउद्देशीय संस्था जळगाव तसेच महाराष्ट्र कुणबी मराठा वधुवर गृप गौरी उद्योग समुह वावडदा ता जि जळगाव यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त केला जातो.

योगेश भालेराव हे शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तत्पर असतात. वेळोवेळी विवीध उपक्रम स्पर्धा ते राबवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष एस.डी.वाघ यांच्यातर्फे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल गौरी उद्योग समूहाचे संचालक सुमित पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment