विज चोरीचा गुन्हा टाळण्यासाठी लाच – तिघांविरुद्ध गुन्हा

On: November 15, 2026 6:33 AM

जळगाव : विज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती पंधरा हजार रुपयांची लाच मागणी व  स्विकार केल्याप्रकरणी सहायक अभियंत्यासह दोघा तंत्रज्ञांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंत्यासाठी लाच स्विकारणा-या तंत्रज्ञास रंगेहाथ पकडण्यात आले. विशाल वसंत नेमाडे (सहायक अभियंता), भरत कडू तायडे (तंत्रज्ञ) आणि रविंद्र छन्नु पाटील (तंत्रज्ञ) अशी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

या घटनेत जळगाव शहरातील तक्रारदाराने विज चोरीचा प्रकार केल्याचे तिघांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या प्रकरणी विज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी भरत तायडे या तंत्रज्ञाने तक्रारदारास फोन करुन विज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारास फोन करुन पांडे चौकात बोलावले. त्यानुसार तक्रारदार पांडे चौकात आल्यानंतर त्यास सुरुवातीला चाळीस हजार रुपयांची तिघांकडून मागणी करण्यात आली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.

एसीबीच्या पडताळणीअंती अभियंता विशाल नेमाडे याच्यासाठी तडजोडीअंती पंधरा हजार रुपये स्विकारण्याची तंत्रज्ञ भरत तायडे याने स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पुढील सापळा रचण्यात आला. या सापळ्यात भरत तायडे याने लाचेची रक्कम स्विकारताच एसीबी पथकाने भरत तायडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

पर्यवेक्षक तथा डिवायएसपी योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यसह हे.कॉ. बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने व मनोज पाटील आदींनी या करवाईत सहभाग घेतला. एसीबी कार्यालयाकडून जळगावच्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कुणाला लाचे संदर्भात तक्रार दाखल करायची असल्यास त्यांनी निर्भयपणे 0257 2235477 या लॅंड लाईन क्रमांकावर अथवा 7588661064 संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment